‘लाल दिव्याची गाडी देईन,दिलीप मोहितेंना आमदार करा’- अजित पवार

0
335

भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. तसेच मुस्लिमविरोधी वक्तव्यांवर अजित पवारांनी संताप केला आहे. एखाद्या समाजघटकांविरुद्धची वक्तव्ये खपवून घेणार नाही, असा इशारा देखील अजित पवारांनी दिला आहे. तसेच दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, असे आश्वासन देखील दिले. अजित पवार खेड-आळंदी विधानसभा दौऱ्यावर आहेत. या वेळी ते मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले,भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका. काही दिवस आम्हाला द्या, चुकलो तर आमचं कान पकडून जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे. मात्र भावनिक होऊन काही वेगळा निर्णय घेऊ नका. तुमचा आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या.

दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो
महायुतीच्या जागा वाटपात खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदारापर्यंत गाडी पोहचली आहे. आता दिव्यापर्यंत गाडी पोहचवण्यासाठी साथ द्या. कार्यसम्राट असणं अन आक्रमक असणं यात फरक आहे. दिलीप मोहिते पाटील हे आक्रमक आहेत. त्यांचा आक्रमक पणा त्यांच्या पत्नी कसा नियंत्रणात आणत असतील, हे खरंच कौतुकाची बाब आहे. म्हणून मी सुरेखा ताईंना मानतो, असेही अजित पवार म्हणाले.

कायदा सर्वांना समान, राजकीय हस्तक्षेप करणार नाही : अजित पवार
देवांच्या आळंदीत चुकीचे धंदे चालतायेत, वेडे-वाकडे प्रकार होतात. आपण तिथं नतमस्तक झाल्याशिवाय पुढं जात नाही. मागे आलो तेव्हा दोन तास दर्शन रांग थांबवावी लागली, लोकं म्हणतील हा कोण लागून गेला. जे ह्याला डायरेक्ट दर्शन दिलं जातं. असं भाविक म्हणणार. म्हणून मी आज बाहेरून दर्शन घेतलं. पण आळंदीत घडणारे प्रकार ही चिंताजनक आहे. आता मी पोलिसांना हवं ते देतोय, मात्र त्यांचं काम नाही का? दोन नंबरचे धंदे बंद करण्याची जबाबदारी कोणाची आहे? इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, योग्य तो बंदोबस्त लावावा. कायदा सर्वांना समान आहे. आम्ही कोणताही राजकीय हस्तक्षेप केला नाही अन् करणार ही नाही. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, असे अजित पवार म्हणाले.

लोकसभेला जे झालं ते गंगेला मिळालं, पण आता विधानसभेला आम्हाला आशीर्वाद द्या : अजित पवार
आरक्षण मला काढायचं आहे, असं राहुल गांधी परदेशात जाऊन बोलले. म्हणजे यांनी बोलायचं अन् पावती आमच्यावर फाडायच्या हे लक्षात घ्या ना, जनतेला आवाहन आहे. लोकसभेला जे झालं ते गंगेला मिळालं, पण आता विधानसभेला आम्हाला आशीर्वाद द्या, असेही आवाहन अजित पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here