‘मला ४०,००० हवेत, पाठव ना’, एआयच्या मदतीने हुबेहूब वडीलांसारखा आवाज काढून एकाची फसवणूक

0
243

उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे माडियाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे आवाज बदलून भामट्याने एका तरुणाची ४० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. डीसीपी नॉर्थ झोन अभिजीत आर शंकर यांनी सांगितले की, शैलेंद्रला त्याच्या वडिलांच्या आवाजात एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. फोन करणाऱ्याने वडील बोलत असल्याचे सांगितले. त्यांना काही इमर्जन्सी आहे आणि त्यांना त्वरित 40 हजार रुपये खात्यात ट्रान्सफर करावेत. त्या व्यक्तीचा आवाज अगदी त्याच्या वडिलांसारखा होता. त्यामुळे शैलेंद्रला अजिबात संशय आला नाही आणि त्याने लगेच पैसे पाठवले. मात्र शैलेंद्रने घरी येऊन याबाबत वडिलांशी बोलले असता, त्यांनी पैशांसंदर्भात कोणताही फोन केला नसल्याचे सांगितले. हे ऐकून शैलेंद्रला धक्काच बसला.

सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपी ॲड्रेस आणि बँक डिटेल्सवरून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, एआयच्या माध्यमातून आवाज बदलून फसवणुकीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

एआय व्हॉईस स्कॅममध्ये फसवणूक करणारे एआयच्या मदतीने दुसऱ्या व्यक्तीचा आवाज तयार करतात. यानंतर ते कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा कार्यालयातील सहकारी असल्याचे भासवून पैशांची मागणी करतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here