हवेत घिरट्या घेत हेलकावे खाल्ले आणि कॅम्पजवळ आल्यावर..पहा हेलिकॉप्टरचा काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ

0
829

उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये शनिवारी हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. भारतीय दलाचे खराब झालेले क्रिस्टल एव्हिएशन हे हेलिकॉप्टर MI-17 या हेलिकॉप्टरला लटकवून गौचर धावपट्टीवर नेले जात होते. मात्र, याचदरम्यान जुने हेलिकॉप्टर मंदाकिनी नदीत कोसळले. या घटनेचा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळी सातच्या सुमारास केदारनाथ आणि गौचरदरम्यान ही दुर्घटना घडली. थोड्या अंतरावर जाताच क्रिस्टल एव्हिएशन हेलिकॉप्टरच्या वजनामुळे आणि वाऱ्याच्या प्रभावामुळे MI-17 हेलिकॉप्टरचा तोल अनियंत्रित होऊ लागला, यानंतर काही सेकंदात क्रिस्टल एव्हिएशन हेलिकॉप्टरने काहीवेळ हवेत घिरट्या घेत हेलकावे खाल्ले आणि थारू कॅम्पजवळ आल्यावर लिंचोली नदीत कोसळले. या घटनेच्या व्हिडीओत तुम्ही हे थरारक दृश्य पाहू शकता.

पहा व्हिडीओ:

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here