पहिल्या दिवशीच हाऊसफुल कमाई! ‘हाऊसफुल ५’ सिनेमाचे बॉक्स ऑफिसवर ‘एवढे’ कलेक्शन 

0
126

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्याची चर्चा होती तो ‘हाऊसफुल ५’ हा कॉमेडीचा थरार मांडणारा सिनेमा अखेर शुक्रवारी(६ जून) सर्वत्र प्रदर्शित झाला. ट्रेलर पासूनच ‘हाऊसफुल’ फ्रॅन्चायझीच्या या पुढच्या भागाची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘हाऊसफुल ५’च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.

 

‘हाऊसफुल ५’ सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल ४’चा रेकॉर्ड मोडला आहे. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी १९ कोटींची कमाई केली होती. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार ‘हाऊसफुल ५’ सिनेमाने पहिल्या दिवशी २३ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता विकेंडला सिनेमाच्या कलेक्शनमध्ये किती वाढ होईल हे पाहावं लागेल.

 

‘हाऊसफुल ५’ सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बजावा, नरगिस फाकरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रगंदा सिंह, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रंजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर आणि आकाशदीप साबिर हे कलाकारही आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here