राशिभविष्य

राशीभविष्य : आज दि. २६ मे २०२४ : “या” राशींच्या लोकांना आज उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्य ता आहे ; तुमची रास काय सांगते ; वाचा सविस्तर

मेष : वर्तनाबरोबरच भूतकाळात झालेल्या चुका सुधारल्या स आश्चर्यकारक सुधारणा होईल. मौजमजेत आणि बाहेरच्या कामात वेळ व्यततित करु नका. यामुळे तुमची वैयक्तिक कामे अपूर्ण राहतील. घरातील मोठ्यांकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून ग्रहस्थितीत काही सकारात्मक बदल होतील. पती-पत्नीचे नाते मधूर होईल. आरोग्याषकडे दुर्लक्ष करु नका.

वृषभ : प्रतिष्ठित लोकांच्या भेटीमुळे लाभ होतील. कार्यक्षमताही सुधारेल. स्वार्थी मित्रांपासून दूर राहा. त्यांचा चुकीचा सल्ला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो. व्यावसायिक संपर्क मजबूत करा. कुटुंबाच्या सहकार्याने कामात लक्ष द्या.

मिथुन : आत्मविश्वासाच्यास जोरावर यश प्राप्तन कराल. प्रतिष्ठित लोकांशी संपर्क मजबूत करा. उत्पन्नाचे साधनाबरोबर खर्चही वाढल्याचने आर्थिक स्थिती बिघडू शकते. राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये अंतर्गत व्यवस्थेत काही बदल घडवून आणा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

कर्क : तुमची मेहनत आणि समर्पण तुम्हाला योग्य फळ देईल. जवळच्या मित्राच्या पाठिंब्याने तुमचे धैर्य वाढेल. राजकीय किंवा न्यायालयाशी संबंधित प्रकरणात सावधानता बाळगा. कुटुंबात सहकार्य आणि आनंदाचे वातावरण राहील.

सिंह : आर्थिक नियोजन योग्यह होईल. विपरीत परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. स्वयबळावर परिस्थिती सुधारण्यास सक्षम असाल. एखाद्यासोबत भागीदारीबाबत योजना असू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राखले जाईल. आरोग्य चांगले राहिल.

कन्या : सकारात्मक गोष्टी घडतील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर झाल्यामुळे दिलासा मिळेल.वारसा हक्काच्या वादावरून तणाव निर्माण होऊ शकतो. तुमचा संशयी स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करा.कुटुंबातील छोट्या-छोट्या वादाकडे दुर्लक्ष करा.

तूळ : जनसंपर्काच्या व्याप्तीबरोबरच तुमची लोकप्रियताही वाढेल. राजकीय लोकांच्या संपर्कात राहाल. आर्थिक कामात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनोळख्यार व्यक्तीशी व्यवहार करू नका. कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका, काही नवीन योजना आणि व्यवसायात यश मिळेल. वातावरणातील बदलाचा आरोग्यूवर परिणमा होईल.

वृश्चिक : तुमचा तत्त्वनिष्ठ दृष्टिकोन समाजात तुमचा आदर करेल. जुन्या नकारात्मक गोष्टींवर कधीही वर्चस्व न ठेवल्याने तुमचे मनोबल कमी होऊ शकते. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. आपले लक्ष फक्त वर्तमान परिस्थितीवर केंद्रित करा. यावेळी उत्पन्नाबरोबरच खर्चाचीही स्थिती असेल. बिघडलेल्यास संवादामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. शिळे अन्न खाणे टाळा.

धनु : आज मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे काम होऊ शकते. घरात शांत आणि आनंदी वातावरण राहील. या लाभदायक ग्रहस्थितीचा पुरेपूर लाभ घ्या. कुटुंबात आणि समाजात सन्मान मिळेल. खूप आदर्शवादी असणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. मनःस्थिती थोडी बिघडू शकते. काही काळापासून मंद गतीने सुरू असलेली व्यावसायिक कामे वेग घेतील. पती-पत्नी एकत्रितपणे कुटुंबाशी चर्चा करतील.

मकर : सर्व कामे शांततेने पूर्ण होतील. विरोधक नमते घेतील. तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते पाळावे. तुमची छाप खराब होऊ शकते. व्यावसायिक कामे थंडावतील. पती-पत्नीचे भावनिक नाते घनिष्ठ होईल. आरोग्य चांगले राहिल.

कुंभ : आज हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल. कौटुंबिक प्रश्नीव जवळच्या नातेवाईकांशी संबंध तणावपूर्वक होतील. सध्या कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा. व्यावसायिक कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाल्यास कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहिल. आरोग्य चांगले राहिल.

मीन : आज उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्य्ता आहे. धार्मिक स्थळी गेल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. बेकायदेशीर कृत्याय असलेल्याा लोकांपासून दूर रहा. समाजात मान-अपमानाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बदल करण्यासाठी वेळ अनुकूल नाही.

 

(टीप : वरील माहिती केवळ वाचका पर्यंत पोहचविणे हा उद्देश ; याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button