भाजप उमेदवारावर ‘या’ राज्यात गावकऱ्यांचा दगडाने हल्ला : व्हिडीओ व्हायरल

0
1

पश्चिम बंगालच्या आठ लोकसभा जागांवर आज मतदान झाले. या दरम्यान, एक विचित्र घटना घडली. झारग्राम येथील मोंगलापोटा येथे भाजपा नेता आणि झारग्रामचे उमेदवार प्रणत टुडू यांच्यावर जमावाने दगडफेक केली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. यात ते जीव तोडून धावताना दिसत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांना त्यांना जमावाच्या तावडीतून वाचविल्याने पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात भाजपा उमेदवार नेते प्रणत टुडू यांनी ममता सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

 

प्रणत टुडू यांनी दावा केला आहे की, पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील गरबेटा परिसरात आपल्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यांना वाचविताना त्यांचे सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही मतदान केंद्रांवर भाजपाच्या एजंटना प्रवेश नाकारल्याची तक्रारी आल्यानंतर प्रणत त्याची खातरजमा करण्यासाठी गारबेटा येथे जात होते. त्यानंतर टीएमसीच्या गुंडांनी माझ्या कारवर अचानक दगडफेक करायला सुरुवात केली आणि रस्ता संपूर्णपण ब्लॉक केला.

 

जेव्हा माझ्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्यांच्यावर तुटून पडले. त्यात ते प्रचंड जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे भाजपा उमेदवार प्रणत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. आपल्या सोबतच्या सीआयएसएफच्या दोन जवानांची डोकी फुटली आहेत, त्यांना रुग्णालयात भरती केल्याचे प्रणत टुडू यांनी सांगितले.

परंतु ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसीने या सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शांततेत सुरु असलेली मतदान प्रक्रिया टुडू यांनी भंग केल्याचा आरोप टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपाचा उमेदवार मतदारांना धमकी देत होता. त्यामुळे गावकरी भडकले आणि त्यांनी आपला विरोध केला.

 

प्रणत टुडू यांच्यावर हल्ला करतानाचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here