‘ह्या’ संजय दत्तच्या चाहत्याने, ‘खलनायक’ पिक्चर बघून गर्लफ्रेंडचा चाकूने चिरला गळा ,कबुलीही दिली ;पहा व्हिडीओ

0
3

एका महिलेचा गळा चिरलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलं आहे. प्रियकराने प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने कॅमेऱ्यासमोर येऊन हसत-हसत गुन्ह्याची कबुली दिली आहे. उत्तर प्रदेशातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझीयाबादमधील खुर्जाच्या मोहल्ला खीरखानी येथील कब्रस्तानमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणात महिला असमा प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

गर्लफ्रेंडने धोका दिला अन् बॉयफ्रेंडने गळा चिरला
मृत महिलेचा प्रियकर अदनान याने कॅमेऱ्यासमोर खुनाची उघडपणे कबुली दिली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी अदमानने कॅमेऱ्यासमोर हसत-हसत गुन्ह्याची कबूली देताना म्हटलं आहे की, प्रेमात फसवणूक करण्याची एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्यू आणि म्हणून असमाला मारलं. इतकंच नाही तर संजय दत्तच्या ‘खलनायक’ या चित्रपटातील बल्लू बलराम या व्यक्तिरेखेने प्रभावित असल्याचंही आरोपीनं सांगितलं आहे. त्याला ना पोलिसांच्या कारवाईची भीती आहे ना असमाला मारल्याचा पश्चाताप, हे व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे.

काय आहे प्रकरण?
पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता शहरातील अदनान या तरुणाचं नाव समोर आलं. पोलिसांनी अदनानला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. अदनानने सांगितले की, त्याचे असमासोबत त्याचं अनेक वर्षांपासून अफेअर होते.

आरोपी अदनानचे विवाहित आसमा या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. असमा दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याचा संशय घेऊन प्रियकर अदनानने महिलेचा गळा चिरून खून केला. ही घटना मंगळवारी घडली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकर अदनानला अटक केली आहे. चौकशीत त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.

अदनानने पोलिसांना सांगितलं की, आसमाकडे एक छोटासा मोबाईल होता, ज्यातून नीट आवाज येत नव्हता. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी तिला दहा हजार रुपये किमतीचा नवा मोबाइल विकत घेऊन दिला होता. जेव्हा-जेव्हा त्याने आसमाला फोन केला तेव्हा तिचा नंबर बिझी म्हणून यायचा. त्यामुळे आसमा इतर तरुणांशीही बोलत असल्याचा संशय त्याला येऊ लागला.

अदनानने भेटण्यासाठी कब्रस्तानमध्ये बोलावलं
या संशयावरून दोघांमध्ये खटके उडत होते. दोघेही खीरखानी येथील कब्रस्तानात अनेकदा भेटत असत. आसमा मंगळवारीही अदनानला भेटण्यासाठी कब्रस्तानात आली होती. जिथे त्याला आसमाच्या फोनमध्ये इतर तरुणांचे फोन नंबर आणि कॉल डिटेल्स सापडले. रागाच्या भरात त्याने धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली.

पाहा व्हायरल व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here