
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली. स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी प्रवासाच्या निमित्ताने वानखेडे स्टेडियमवर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई ही देशातील क्रिकेटची पंढरी समजली जाते. या कार्यक्रमात मुंबईकर क्रिकेटर्सशिवाय प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थितीत लावली होती.
अनेक क्रिकेटर्संनी खास किस्से शेअर करत जुन्या आठणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात लिटल मास्टर सुनील गावसकर, रवी शास्त्री, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते अगदी भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात रोहित शर्मानं आपल्या हटके अंदाजानं लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्माचा स्टेजवरील म्युझिक मोड अन् त्याने डान्ससाठी टीम इंडियातील स्टार खेळाडूकडे दाखवलेले बोट हा सीन एकदम खास होता. टीम इंडियातील नंबर वन डान्सर कोण? याची हिंटच जणून रोहित शर्मानं या कार्यक्रमात दिली. गाणं सुरु झाल्यावर रोहित शर्मा टीम इंडियातील आपला सहकारी आणि मुंबईकर श्रेयस अय्यरला हातवारे करून डान्ससाठी स्टेजवर बोलावताना दिसले.