हृदयद्रावक! आईसोबत घरासमोर खेळत असलेल्या एका चिमुकलीला कारने चिरडले, घटना CCTV कैद

0
15

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एक धक्कादायक घडना घडली. आईसोबत घरासमोर खेळत असलेल्या एका चिमुकलीला कारने चिरडले आहे. ही घटना शुक्रवार रात्री उशिरा घडली. अपघातात चिमुकलीला गंभीर दुखापत झाल्यामुळे तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा येथील सेक्टर 63 येथील बी ब्कॉलमध्ये ही घटना घडली आहे.या घटनेचा काळाजचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आई आणि चिमुकली घराबाहेर रस्त्यावर खेळत होते. त्याच दरम्यान एक कार वळण घेत होती. वळण घेताच, कारच्या चाकाखाली चिमुकलीला चिरडले. मुलीला चिरडलेले पाहून आईने हंबरडा फोडला. कार चालक कारमधून बाहेर आला.

आईने गंभीर जखमी झालेल्या मुलीला जवळ घेतले आणि हतबल झालेली आईने जोरजोरात ओरडू लागली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आजूबाजूला गर्दी केली. मुलीची आईने आणि कार चालकाने ताबडतोब मुलीला रुग्णालयात दाखल केले. कैलास रुग्णालयात मुलीवर उपचार सुरु आहे. 18 महिन्यांची मुलगी आता मृत्यूंशी झुंज देत आहे.

मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळता, सेक्टर 63 पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई सुरू केली आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here