चोरी करायला गेला अन , 14 व्या मजल्यावरून पाय घसरून खाली पडला ,चोरट्याचा जागीच मृत्यू

0
229

मुंबईतील विक्रोळी परिसरात चोरी करणाऱ्या एका चोराचा प्रयत्न फसला आहे. चोरी करणाऱ्यासाठी गेलेल्या तरुणाचा इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाला आहे. 14 व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये चोरी करण्यासाठी गेला होता. सकाळच्या वेळीस अपार्टमेंटमधून एक व्यक्ती वरतून खाली पडला अशी माहिती अपार्टमेंटमधील सिक्युटरी गार्डने दिली. या घटनेची माहिती गार्डने अपार्टमेंटच्या अध्यक्षांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय अर्जून बाईत असं तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास तो विक्रोळी येथील उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये चोरी करण्यासाठी गेला होता. ही घटना विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार येथील मधुकुंज सोसायटीतील घटना आहे. अक्षय 14 मजल्यावरून खाली पडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माध्यमांना माहिती दिली की, 14 व्या मजल्यावरून पडून आरोपीचा मृत्यू झाला. पाय घसरून तो खाडी पडला असावा.

पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित केले. पार्क साइट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरिक्षक संतोष घाटेकर यांनी माहिती दिली की, अक्षय बाईत हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद होती. हत्या आणि चोरीच्या अनेक प्रकरणात त्यांची नोंद होती.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here