“त्यांनी विधानसभेला स्वत: माझ्यासमोर येऊन उभं राहावं”, छगन भुजबळ यांचं मनोज जरांगे यांना खुलं आव्हान

0
235

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद आता आणखी शिगेला पोहोचण्याची चिन्हं आहेत. कारण छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर येवला मतदारसंघात उमेदवारी लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने मराठा आरक्षणावर भूमिका मांडताना, आपली मागणी मान्य झाली नाही तर सत्ताधारी पक्षाचे आमदार पाडू, असा इशारा दिला जात होता. आपण मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीला उभे करु आणि सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पायउतार करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात येत होता.

“अरे बाबा तू स्वत: माझ्यासमोर उभं राहयला ये. माझी इच्छा आहे. त्यांनी स्वत: माझ्यासमोर येऊन उभं राहावं”, असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं. “भुजबळांना पाडलं तरी भुजबळांचा आवाज बंद होणार नाही. ओबीसींचं आरक्षण आणि संरक्षण करणं माझं काम आहे. सरकारमध्ये असो की बाहेर आवाज उठवणं हे भुजबळांचं काम आहे. या ५७-५८ वर्षात रस्त्यावर आणि सरकारमध्ये काम करण्याची सवय आहे. येवल्यात कोणीही या. भुजबळ लाख मते घेऊन विजयी होणार”, असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला.

“मनोज जरांगे यांनी रोज भूमिका बदलू नये. २८८ उमेदवार तुम्ही उभे करणार आहात. तुमच्या हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा. आमचं आव्हान आहे. प्रत्येकवेळी कशा बदलता? उपोषणाला बसतो म्हणतात आणि उठतो. मग म्हणतात मुस्लिमांना आरक्षण द्या. अहो मुस्लिमांना आम्ही आरक्षण दिलं. माहीत नसलेल्या गोष्टीवर ते बोलतात. अर्धवट माहिती असलेले लोक बोलतात. मध्यचे म्हणतात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार. अरे बाबा तुला काय करायचं ते कर. पण २८८ जागा लढवं”, असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here