स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 विजेता मुनव्वर फारुकी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील मुनव्वर त्याने केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. मुनव्वरने पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन वेदांतवर निशाणा साधत एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. प्रत्येकाला माहिती आहे की , 17 वर्षीय वेदांतने त्याच्या पोर्श कारने अपघात केला असून, अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. अशात 15 तासांत वेदांतला जामिन मंजूर झाल्यानंतर खळबळ माजली होती. आता वेदांतला बाल सुधार गृहात ठेवण्यात आलं आहे. त्याच्या वडिलांना म्हणजे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यात झालेल्या अपघाताचा सर्वच स्तरातून विरोध होत असताना मुनव्वरने देखील संताप व्यक्त केला आहे. एक्सवर मुनव्वरने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मुनव्वर म्हणाला, ‘तो पोर्श खरेदी करू शकतो तर, बाकी गोष्टी देखील विकत घेऊ शकतो…’ एवढंच नाहीतर, आणखी एक एक्स करत मुनव्वर म्हणाला, ‘मी 17 वर्षांचा होतो तेव्हा माझ्याकडे फक्त नोकिया 1100 फोन होता. ज्याला 2 रबर लावलेले होते…’ सध्या मुनव्वरची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
मुनव्वरच्या पोस्टवर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येक जण मुनव्वरच्या बाजूने कमेंट करत बिल्डर बाप-लेकाचा विरोध करत आहेत. आरोपींवर योग्य कारवाई झाली पाहिजे, त्यांनी शिक्षा झालीच पाहिजे… पैसा असल्यामुळे दोन जणांचा जीव घेतला आहे.
अन्य एका नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘त्या कुटुंबियांना विचारा ज्यांनी आपल्या मुलांना गमावलं आहे. त्यांचं दुःख पैशांनी खरेदी करता येणार नाही.’ मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी वेदांतच्या आजोबांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. वेदांतच्या आजोबांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आता याप्रकरणी काय समोर येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.