आनदांची बातमी! १२वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; अर्ज कसा करायचा…

0
297

माणदेश एक्सप्रेस न्युज/  मुंबई : रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. रेल्वेत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असं अनेक तरुणांना वाटतं. जर तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

साउथ वेस्टर्न रेल्वेमधील नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सहाय्यक कार्मिक अधिकारी/ मुख्यालय, दक्षिण पश्चिम रेल्वे- मुख्यालय कार्यलय, कार्मिक विभाग, रेल सौधा, गदग रोड, हुबळी-५८००२० येथे अर्ज पाठवायचा आहे.या नोकरीसाठी तुम्हाला २०,२०० रुपये पगार मिळणार आहे.तसेच इतर भत्तेदेखील दिले जाणार आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वेत ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी भरती केली जाणार आहे. स्पोर्ट्स कोटाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित खेळातील प्रमाणपत्र (बास्केटबॉल, अॅथलेटिक्स, क्रिकेट)असायला हवे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.