
माणदेश एक्सप्रेस न्युज : कोळा/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील श्री.श्री गुरनिर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी 30 वे पिठाधिपती यांचे आज गुरुवार, दिनांक 13 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी आजारपणामुळे निधन झाले त्त्यांचे निधनासमयी 63 वय होते.
श्री श्री रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी आजारपणामुळे सांगली येथील सेवासदन येथे त्याच्यावर उपचार सुरु होते पण त्याना पुढील उपचाराची गरज असल्यामुळे कोल्हापूर येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु केले पण आज गुरुवार ( दि.13 /06/2024 ) रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी त्त्यांचे कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये प्राणज्योत मावळली.
कोळेकर महास्वामीजी शिवैक्य झाले असल्याचे समजताच कोळा व निमसोड गावासह परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. तसेच अनेक भक्तगाणानी टाहो फोडला आहे. कोळा येथील मुख्य मठामध्ये आज सायंकाळी 5 वाजल्यापासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत भक्तगणाच्या त्यांचा देह दर्शनासाठी ठेवण्यात येईल व त्यानंतर शुक्रवार दिनांक 14/06/2024 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून पुढे 4 वाजेपर्यंत समाधी सोहळा होणार आहॆ असे श्री श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी लिंगायत मठ संस्थान कोळा यांच्या कडून सांगण्यात आले.
त्याच्या अंत्य दर्शनासाठी कोळा येथील मठामध्ये लाखो भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे उद्या वार शुक्रवारी रोजी होणारा कोळा गावचा आठवडी बाजार भरणार नाही अशी कोळा ग्रामपंचायत कडून सूचना देण्यात आली आहे.