खुशखबर ! सोने-चांदी झाले स्वस्त, आत्ताच करा खरेदी …

0
59

 

गेल्या 15 दिवसांत सोने-चांदीने कोणताही नवीन रेकॉर्ड केलेला नाही. मार्च ते मे महिन्यात मौल्यवान धातूंनी अनेक रेकॉर्ड केले. नवीन विक्रम नावावर केले. पण जून महिन्यात दोन्ही धातूंना कमाल दाखवता आली नाही. या आठवड्याची सुरुवात पण ग्राहकांसाठी आनंददायक ठरली. आठवड्याच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातूत घसरण झाली. गेल्या आठवड्याच्या अखेरच्या सत्रात बेशकिंमती धातूने अचानक उसळी घेतली होती. आता असा आहे सोने-चांदीचा भाव

सोन्यामध्ये स्वस्ताई

गेल्या आठवड्यात सोने हजार रुपयांनी वधारले. आठवड्याच्या अखेरीस बेशकिंमती धातूत दरवाढ झाली. 15 जूनला सोन्याने 660 रुपयांची उसळी घेतली. या आठवड्याच्या सुरुवातीला 17 जून रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र दिसले. गेल्या आठवड्यात चांदी 2000 रुपयांपेक्षा अधिकने घसरली होती. आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात 15 जून रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली होती. त्यानंतर दोन दिवस भावात बदल झाला नाही. आज सकाळी किंमतीत किंचित 100 रुपयांची घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले आणि चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,866 रुपये, 23 कॅरेट 71,578 रुपये, 22 कॅरेट सोने 65,829 रुपये झाले. 18 कॅरेट 53,900 रुपये, 14 कॅरेट सोने 42,042 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 87,833रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here