ताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

तरुणांसाठी सुवर्णसंधी ! ‘ही’ पदे जाणार भरली जाणार ;लवकर करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरती म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

भारतीय वायुसेनेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट भारतीय वायुसेनेत नोकरी करण्याची संधी नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया अविवाहित स्त्री आणि पुरुष अग्निवीरवायू वादकांसाठी सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. हेच नाही तर उमेदवारांना संबंधित वाद्य वाजविता आली पाहिजेत.

क्लॅरिनेट, फ्रेंच हॉर्न, युफोनियम, बास, बॅरिटोन, सॅक्सोफोन, बासरी, गिटार, व्हायोलिन, ड्रम्स अशी वाद्य वाजवता आली पाहिजेत. यासोबतच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असलेला असावा. https://agnipathvayu.cdac.in/AV/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

https://agnipathvayu.cdac.in/AV/img/rally/AV_Musician_Rally_01_2025.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 5 जून 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणाली लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button