ताज्या बातम्या

सोने ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त ; तर चांदीने मोडले रेकॉर्ड

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने दरवाढीचा नवीन रेकॉर्ड नावावर नोंदवला. सोन्याने 75 हजारांटा टप्पा ओलांडला, तर चांदी थेट 96 हजारांच्या घरात पोहचली होती. आता किंमतीत मोठी घसरण आली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने नवीन विक्रम नावावर नोंदवला. सोन्याने मोठी घौडदौड केली. तर चांदीने सर्व रेकॉर्ड मोडले. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. पण तेजीचे हे सत्र कायम राहिले नाही. गेल्या पाच दिवसांत मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोने 2700 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदीत 6 हजारांची पडझड झाली. या आठवड्याच्या अखेरीस अशी आहे सोने आणि चांदीची किंमत

सोने 2700 रुपयांनी उतरले

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने 75 हजारांचा टप्पा पार केला. 20 मे रोजी सोने 500 रुपयांनी महागले. त्यानंतर त्यात पडझड झाली. 21 मे रोजी 650 रुपये, गुरुवारी 1100 रुपये तर 24 मे रोजी 980 रुपयांची घसरण झाली. 22 आणि 25 मे रोजी भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 6 हजारांनी स्वस्त

गेल्या दोन आठवड्यांत चांदीने 12,000 हून अधिकची चढाई केली. त्यानंतर चांदीत 6 हजारांची स्वस्ता आली. 20 मे रोजी 3500 , 21 मे रोजी 1900, 22 मे रोजी 1200 रुपयांनी तर 23 मे रोजी किलोमागे चांदीचा भाव 3300 रुपयांनी खाली आला. 24 मे रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 72,028 रुपये, 23 कॅरेट 71,740 रुपये, 22 कॅरेट सोने 65,978 रुपये झाले. 18 कॅरेट 54,021 रुपये, 14 कॅरेट सोने 42,136 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 89,762 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

गेल्या पाच वर्षांत असा दिला रिटर्न

गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांची झेप घेतली आहे. अर्थात 1, 3, 10 आणि 15 वर्षांच्या आकडेवारी नजर टाकली तर निफ्टीने सोन्याला पिछाडीवर टाकल्याचे दिसून येते. गेल्या सात वर्षांत दोघांचा रिटर्न सारखाच होता. या दरम्यान निफ्टीने 15% सीएजीआर रिटर्न तर सोन्याने 14 टक्के वाढ नोंदवली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button