ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

“माझ्या शाळेत आणि घरात कधीच जात या विषयावरून चर्चा झाली नाही.”पहा काय म्हणाली जान्हवी ?

अभिनेत्री जान्हवी कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे जात या विषयावर कधीच शाळेत किंवा घरात चर्चा झाली नाही, असंही तिने सांगितलं आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी इतिहास या विषयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. इतिहासातील असा कोणता काळ तुला पुन्हा पहायला आवडेल, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर तिने सांगितलं की तिला भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्त्व करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पहायला आवडले.

‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला विचारलं गेलं, “इतिहासातील असा कोणता काळ आहे, जो तुला पुन्हा पहायला आवडेल?” याचं उत्तर देताना जान्हवी म्हणाली, “मला इतिहास या विषयाची आधीपासूनच खूप आवड आहे. तुम्हाला खरंच सत्य जाणून घ्यायचं आहे का? पण मी उत्तर दिल्यावर तुम्ही त्यावरून मला प्रतिप्रश्न करू नका. कारण माझी मतं प्रेक्षकांपर्यंत कोणत्या उद्देशाने पोहोचतील, याचा अंदाज बांधता येत नाही. मला असं वाटतं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. कोणत्या मूल्यांसाठी ते लढले आणि त्यांची मतं काळानुसार कशी बदलत गेली, त्याचा लोकांवर कसा प्रभाव पडला याबद्दलची केवळ चर्चा ऐकायची आहे. या दोघांनीही आपल्या समाजाला खूप काही दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की ती चर्चा खरीच ऐकण्यासारखी असेल.”

जान्हवी पुढे म्हणाली, “सुरुवातीपासूनच आंबेडकर यांची मतं (जातीच्या बाबतीत) फार कठोर होती. तर गांधींची मतं वेळेनुसार विकसित होत गेली. आपल्या समाजातील जातीची समस्या.. एका तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्याबाबत जाणून घेणं आणि ते आयुष्य जगणं यात खूप मोठा फरत आहे.” यानंतर जान्हवीला विचारलं गेलं की तिच्या शाळेत कधी जातीच्या विषयावरून चर्चा झाली का? त्यावर तिने सांगितलं, “माझ्या शाळेत आणि घरात कधीच जात या विषयावरून चर्चा झाली नाही.”

जान्हवीच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, ती ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत मुख्य भूमिका साकारतेय. शरन शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग अवघ्या 30 दिवसांत पूर्ण झालं. तर जान्हवीने तिच्या भूमिकेसाठी 150 दिवस प्रशिक्षण घेतलं होतं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button