
मुंबई (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढलेले सोनं आणि चांदीचे दर आता पुन्हा घसरताना दिसत आहेत. आज ४ जुलै रोजी (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याच्या दरात १९५ रुपयांची घट, तर चांदीच्या दरात २५३ रुपयांची घसरण झाली आहे. मात्र, या घसरणीनंतरही चांदीचा दर प्रति किलो १.१० लाख रुपयांच्या पुढेच आहे.
आजचे अपडेट झालेले दर (IBJA नुसार):
🔸 २४ कॅरेट सोनं:
दर: ₹97,142 प्रति 10 ग्रॅम
GST सहित: ₹1,00,056 प्रति 10 ग्रॅम
🔸 २३ कॅरेट सोनं:
दरात ₹194 ची घट
नवा दर: ₹96,753 प्रति 10 ग्रॅम
GST सहित किंमत: ₹99,655
🔸 २२ कॅरेट सोनं:
दरात ₹179 ची घट
नवा दर: ₹88,982 प्रति 10 ग्रॅम
GST सहित किंमत: ₹91,651
🔸 १८ कॅरेट सोनं:
नवा दर: ₹72,857 प्रति 10 ग्रॅम
GST सहित किंमत: ₹75,042
🔸 १४ कॅरेट सोनं:
नवा दर: ₹56,828 प्रति 10 ग्रॅम
GST सहित किंमत: ₹58,532
🔸 चांदी:
दरात ₹253 ची घट
नवा दर: ₹1,10,588 प्रति किलो (GST सहित)
IBJA (India Bullion & Jewellers Association) दर ही देशातील बेंचमार्क किंमत मानली जाते, मात्र प्रत्येक शहरात स्थानिक कर आणि दागिन्यांवरील मेकिंग चार्जेसनुसार किंमत 1,000 ते 2,000 रुपयांनी वेगळी असू शकते.
हे दर दिवसातून दोन वेळा – दुपारी १२ वाजता व संध्याकाळी ५ वाजता जाहीर होतात.
वर दिलेले दर मेकिंग चार्जेस आणि इतर स्थानिक करांशिवाय आहेत.