आंध्र प्रदेशातील कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री धर्मपूरी श्रीनिवास यांचे निधन झाले. शनिवारी पहाटे ३ वाजता त्यांना ह्रदयविकाराचा झटाका आला आणि त्याच वेळीस त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते. श्रीनिवास यांनी खासदार आणि पीसीसी अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले असा परिवार आहे. श्रीनिवास यांच्या निधनानंतर कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.