अखेर मराठी कलाविश्वातील “ही” जोडी अडकली लग्नबंधनात

0
458

मागील काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेच्या लग्नाची जोरादार चर्चा सुरु होती. त्यांच्या लग्नाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज (२१ जानेवारी २०२५) या दिवशी अंबर-शिवानी लग्नबंधनात अडकले आहेत. आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली आहे.

 

 

गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. अगदी काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही मोठ्या दणक्यात त्यांची बॅचलर पार्टी साजरी केली. शिवानी आणि अंबर यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला आहे. आपल्या लग्नासाठी दोघांहीनी सुंदर अशी वेशभूषा केली आहे. शिवानीने हिरव्या रंगाची साडी आणि अंबरने ऑफ व्हाइट रंगाचा सदरा आणि त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेऊन लग्नात खास लूक केला आहे. या नवोदित जोडप्यावर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.