एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात, 15 हून अधिक प्रवासी जखमी

0
298

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या बसचा रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघात झाला. तसेच या अपघातात सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्ग पोलीस आणि एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा मार्गावर कसाल येथे एसटी बसला अपघात झाला. राज्य परिवहन बसची एक्स्प्रेस वेवर उभ्या असलेल्या कंटेनरला धडक बसली. त्यामुळे बसमध्ये प्रवास करणारे 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते.

मालवण-कोल्हापूर-तुळजापूर एसटी बसने महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here