व्हीआयपी दर्शन पद्धत बंद झाल्यामुळे तब्बल 8 लाख भाविकांना घेता आले विठुरायाचे दर्शन

0
166

आषाढी यात्रेसाठी दर्शन रांगेत हजारो भाविक असताना घुसखोरी करून व्हीआयपी दर्शन घेणाऱ्यांवर माझाच्या दणक्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे. दरम्यान व्हिआयपी दर्शन बंद झाल्यामुळे गेल्या 7 दिवसात झटपट दर्शन बंद केल्याने आषाढीपूर्वी तब्बल 8 लाख भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता आले आहे. आषाढीपूर्वी सर्वसामान्य 8 लाख भाविकांना मिळालेले दर्शन हे व्हीआयपी व्यवस्था बंद केल्याचे परिणाम आहेत. याबाबत खुद्द मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी माझाशी बोलताना माहिती दिली आहे.

24 तास दर्शन सुरु असल्याने रोज 32 हजार भाविकांना 8 ते 10 तासात पायावर दर्शन
दर्शन घेतलेल्या भाविकांमधील तब्बल दोन लाख वीस हजार भाविकांना देवाच्या पायावर दर्शन मिळाले आहे. एका बाजूला दर्शन रांगेतील गर्दी वाढत असली तरी अखंड 24 तास दर्शन सुरु असल्याने रोज 32 हजार भाविकांना 8 ते 10 तासात पायावर तर 80 हजार भाविकांना केवळ 2 तासात मुखदर्शन मिळत असल्याचे शेळके यांनी सांगितले .

3 भाविकांवर काल कारवाई केल्यानंतर आता घुसखोरीची प्रमाण बंद कमी झाले
दर्शन रांगेतील महिला भाविकाशी धक्काबुक्की करणाऱ्या मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकाला निलंबित केले असून सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या ठेकेदारालाही नोटीस बजावल्याचे यावेळी शेळके यांनी सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांनी भाविकांसी सौजन्याने वागण्याचे आदेश देण्यात आले असून कुठेही भाविकांशी गैरवर्तन आढळल्यास यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा शेळके यांनी दिला आहे. दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या 3 भाविकांवर काल कारवाई केल्यानंतर आता घुसखोरीची प्रमाण बंद कमी झाले असून आता यात्रा होईपर्यंत कोणत्याही व्हीआयपीन थेट दर्शन दिले जाणार नसल्याचे राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदेंचा पूर्वतयारी व पाहणी दौरा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 14 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. बारामती येथून शासकीय मोटारीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रयाण करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंचा दुपारी 12.00 वाजता आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी व पाहणी दौरा असणार आहे.