सांगलीतील जतमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितामुळे चारा, छावण्यांचा भासतोय तुटवडा ; टँकरचा प्रस्ताव मंजूर होईना

0
2

सांगलीतील जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता अधिकच वाढत चालली आहे. जत तालुक्यातील पूर्व भागातील 73 गावांच्या 533 वाड्या-वस्त्यांवर 97 टँकरनं सध्या माणसांना आणि जनावरांना पाणीपुरवठा केला जात आहे. पण चाऱ्याच्या तुटवड्यामुळे चारा छावणीची मागणी वाढू लागली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे चारा छावणी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर होत नसल्याचं जतच आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हंटलं आहे. तर जत तालुक्यातील पूर्व भागांतील काही भागांत चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याबाबत मागणी अर्ज आलेले आहेत. या अर्जाच्या संदर्भात अहवाल एक दोन दिवसांमध्ये शासनास पाठवला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे बऱ्याच गावांचे प्रस्ताव अजून प्रांत, तहसील कार्यालयात पडून आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितामुळे या प्रस्तावानेला मान्यता देण्यात उशीर होत आहे. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर टँकरचे प्रस्ताव मंजूर करावेत आणि दुष्काळी तालुक्यातल्या जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली आहे.

सध्या जत तालुक्यातील पूर्व भागांत जवळपास 97 टँकरद्वारे जनावरांना आणि माणसांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर जत तालुक्यातील पूर्व भागांतील काही भागांत चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याबाबत अर्ज आलेले आहेत. त्या अर्जाच्या संदर्भात तपासणी करून त्याचा अहवाल एक ते दोन दिवसांमध्ये शासनास पाठवला जाणार आहे. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये काहीसा पाऊस पडलेला असला तरी लगेच हिरवा चारा उपलब्ध होण्याची शक्यता तशी कमी आहे. सध्या उपलब्ध आहे, त्या चाऱ्याचं योग्य ते नियोजन करण्याचा प्रयत्न आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here