ट्रॅक्टर शर्यतीमध्ये अचानक चालकाचा सुटला ताबा, अनेकजण जखमी; पहा थरारक व्हिडीओ

0
11

पंजाबमधील पहाडगढ येथील डोमेली गावात ट्रॅक्टर शर्यत आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. शर्यतीत वापरण्यात आलेला ट्रॅक्टरचं नियंत्रण सुटल्याने उपस्थित लोकांना त्याची धडक लागली आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन ट्रॅक्टर जप्कृत केले आणि चार जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावात ट्रॅक्टर शर्तयीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शर्यतीत ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर जाऊन गर्दीत घुसला, या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तीन ट्रॅक्टर जप्त केले असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ट्रॅक्टर शर्यती आयोजित करणाऱ्यांच्या दुर्लक्षावर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. शर्यतीच्या आयोजनात सुरक्षा व्यवस्थेवर दुर्लक्ष करण्यात आले आहे हे या अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.

पहा व्हिडओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here