तुम्हीपण शॅम्पू निवडताना करता का ‘ही’ चूक? कसा निवडाल योग्य शॅम्पू?

0
148

मार्केटमध्ये अनेक वेग-वेगळे शॅम्पू मिळतात. पण तुमच्या हेअर टाईपनुसार कोणता शॅम्पू निवडता… याची देखील काळजी घ्यायला हवी. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी केस स्वच्छ धुतल पाहिजे. केस न धुतल्यामुळे हेयर फॉल, कोंडा (डँड्रफ) यांसारख्या समस्या डोक वर काढतात. केसांची काळजी घेण्यासाठी महिला अनेक पद्धतींचा अवलंब करतात आणि त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे ते शैम्पू… बहुतेक लोक थेट बाजारातून शाम्पू खरेदी करतात. पण हेयर टाईप कोणत्या प्रकारचा आहे… याबद्दल कोणतीही काळजी घेत नाही. सांगायचं झालं तर, शॅम्पूचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही ज्या शॅम्पूने केस स्वच्छ करत आहात ते तुमच्या केसांसाठी लाभदायक आहे का? जाणून घ्या…

सल्फेट नसलेला शॅम्पू – सल्फेट तुमच्या केसांसाठी घातक ठरू शकते. म्हणून ज्या शॅप्मूमध्ये सल्फेटचं प्रमाण आहे, ते शॅम्पू विकत घेऊ नका. यामुळे केसांचं नैसर्गीक सौंदर्य कमी होतं. सल्फेट नसलेल्या शॅम्पूचा वापर कोणीही करु शकतं. सल्फेट असलेल्या शॅम्पूचा वापर केल्यास केसांचं सौंदर्य कमी होऊ शकतं.

अँटी डँड्रफ शॅम्पू : मार्केटमध्ये मोठ्या संख्येत एन्टी डँड्रफ शॅम्पू उपलब्ध आहे. कारण अनेक महिलांना कोंडयाचा त्रास असतो. केसात सतत वाढणाऱ्या कोंड्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अँटी डँड्रफ शॅम्पूचा वापर करावा. सॅलिसिलिक ऍसिडसह अँटी-डँड्रफ शॅम्पूचा वापर केल्यास केसातील कोंडा कमी होण्याची शक्यता असते.

क्लेरिफाइंग शॅम्पू : ज्यांचे केस ऑयलीकिंवा स्निग्ध आहेत त्यांनी या प्रकारचा शॅम्पू वापरावा. क्लेरिफाइंग शॅम्पूचा वापर केल्यास केसांना फायदा होतो. शॅम्पूमध्ये सोडियम लॉरील सल्फेट असते ज्यामुळे केस चांगले स्वच्छ होतात. पण त्याचा रोज वापर केल्यास केसांचं नुकसान होऊ शकतं.

प्रोटेक्टिंग शॅम्पू : ज्यांनी केस कलर किंवा हायलाईट केले असतील त्यांनी प्रोटेक्टिंग शॅम्पूचा वापर करणं फायद्याचं ठरेल. प्रोटेक्टिंग शॅम्पूचा वापर केल्यास केसांना केलेलं कलर फिका पडत नाही. आता अनेक महिला केस हायलाईट करतात. अशा महिलांनी प्रोटेक्टिंग शॅम्पूचा वापर करणं फायद्याचं ठरेल.

आठवड्यातून किती वेळा केस धुवावे : तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन केसांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आठवड्यातून जवळपास तीन वेळा तरी केस स्वच्छ धुवायला हवेत.. ज्यामुळे केस स्वच्छ राहतात आणि केसांचं सौंदर्य कायम राहतं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here