![देवेंद्रफडवनिस](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2024/08/देवेंद्रफडवनिस.jpg)
माणदेश एक्सप्रेस न्यूज :मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आका सहित सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने भेट घेतली. यावेळी आमदार सुरेश धस हे देखील उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, वाल्मिक कराडसह सगळ्यांची पाळमुळं उखडून काढा. घटना घडल्यानंतर, त्याआधी ज्यांनी मदत केली आहे, आरोपींना आसरा दिला, फरार केला त्या सगळ्यांना सहआरोपी करा अशी मागणी आम्ही केली आहे. असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमली आहे. एक ते दोन दिवसांत काही बदल असतील किंवा जी अडचण असेल त्या सांगा. तसंच आरोपींना काहीही झालं तरीही आम्ही सोडणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं. आम्ही जेव्हा त्यांना सगळं सांगत होतो तेव्हा मुख्यमंत्री गांभीर्याने ऐकत होते. सगळा विचार केला तर तपास योग्य पद्धतीने होईल असा विश्वास आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन जे काही राजकारण होतं आहे त्यात मी फार काही बोलणार नाही.
माझ्या भावासाठी जे न्याय मागत आहेत ते योग्यच आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. बाकी मी फार काही बोलणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे की आम्ही आरोपींना कठोर शिक्षा करणार, असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी सांगितलं.