पंजाबराव डखांनी सांगितली तारीख ; राज्यात कधी पडणार मोठा पाऊस?, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

0
14

मुंबई : राज्यामध्ये पावसाबाबत पंजाबराव डखांनी महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 23 तारखेपासून राज्यात मोठा पाऊस होणार असल्याचा इशारा पंजाबराव डखांनी दिला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 22 जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. यानंतर मात्र परिस्थिती बदलणार आहे 23 जून नंतर महाराष्ट्रात विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे. 23 जून ते 25 जून दरम्यान तुरळक ठिकाणी पण चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.

दरम्यान, 26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. एवढेच नाही तर त्यांनी जुलै महिन्यात 10 ते 15 जुलै या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 19, 20 आणि 25, 26 जुलै दरम्यानही चांगला पाऊस पडणार असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार,  राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात मुंबईच्या हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here