कर्नल सोफिया कुरेशी यांचं मराठी कनेक्शन

0
386

माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : मराठा लाइट इन्फट्री असलेल्या बेळगावच्या शिरपेचात आणखी एक एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या सूनबाई आहेत. त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हेदेखील भारतील लष्करामध्ये कर्नल पदावर कार्यरत आहेत.

 

भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. भारताच्या या कारवाईची जगाला माहिती देण्यासाठी दोन रणरागिणी समोर आल्या. एक म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या म्हणजे विंग कमांडर व्योमिका सिंह. त्यापैकी कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या सूनबाई आहेत.
कर्नल सोफिया कुरेशी यांचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी हे मूळचे बेळगावातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर या गावचे आहेत. सध्या सोफिया या जम्मू मध्ये कर्नल पदावर सेवा बजावत आहेत. तर त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे झाशीमध्ये सेवा बजावत आहेत.

 

मूळच्या गुजरातच्या असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा 2015 साली बेळगावच्या कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांच्याशी विवाह झाला. त्यांचा हा प्रेमविवाह आहे. पती आणि पत्नी हे दोघेही भारतीय सैन्यात कर्नल म्हणून सेवा बजावत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी हल्ले करत अनेक दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

 

भारताच्या या कारवाईची माहिती जगाला देण्यासाठी लष्कराने कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची निवड केली. कर्नल सोफिया यांनी ती निवड सार्थ ठरवत, आपला करारी बाणा दाखवत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. त्यानंतर कर्नल सोफिया यांची जगभर चर्चा सुरू झाली. गुगलवर सोफिया यांच्याबद्दल सर्च केले जाऊ लागले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here