आटपाडीतील तीनही शिवभोजन केंद्राबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचा मोठा निर्णय……

0
10

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील तीनही शिवभोजन केंद्राबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी मोठा निर्णय दिली असून तीनहीही शिवभोजन केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी येथील शिवभोजन केंद्राबाबत वारवार तक्रारी झाल्या होत्या. याबाबत तहसीलदार यांनी तीनही शिवभोजन केंद्राची तपासणी करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे अहवाल दिला होता. त्या अहवालानुसार जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई केली आहे.

यामध्ये शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लाभार्थी हे संबंधित शिवभोजन केंद्र चालक यांचेकडून वंचित राहिले असून शासन परिपत्रक दि. 30 मार्च, 2022 मधील मुद्दा क्र.4 (आ) मध्ये पूर्व कल्पना न देता शिवभोजन केंद्र बंद ठेवणे, शिवभोजन निकषाप्रमाणे भोजन न देणे, तसेच पुनःश्च तपासणी केली असता, CCTV चा डेटा उपलब्ध करुन न देणे अशा प्रकारच्या अनियमितता निदर्शनास आलेल्या आहेत.

या नंतरही पुढील तपासणी मध्ये अशा प्रकारची गंभीर स्वरुपाची अनियमीतता आढळल्यास सदर शिवभोजन केंद्र बंद करणेत यावे, तसेच मुद्दा क्र. 4 इ) नुसार अतिगंभीर स्वरुपाची अनियमितता- उदा. दुबार फोटो अपलोड करणे, अशा स्वरुपाच्या अनियमितता आढळून आल्यास शिवभोजन केंद्र तात्काळ निलंबित करून सदर केंद्राची मंजुरी रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी, असे नमूद आहे. त्यास अनुसरुन शिवभोजन केंद्रचालक, सौ. अलका राजाराम जाधव, मानशी महिला बचत गट आटपाडी, शिवभोजन केंद्र चालक उत्तम नामदेव बालटे, हॉटेल ओमरत्न, आटपाडी, शिवभोजन केंद्रचालक, सौ. लता अशोक माळी, राधिका डायनिंग हॉल, आटपाडी हे दोषी असलेचे सिध्द होते.

त्यामुळे, त्यास अनुसरुन शिवभोजन केंद्रचालक, सौ. अलका राजाराम जाधव, मानशी महिला बचत गट आटपाडी, शिवभोजन केंद्र चालक उत्तम नामदेव बालटे हॉटेल ओमरत्न, आटपाडी, शिवभोजन केंद्रचालक, सौ. लता अशोक माळी, राधिका डायनिंग हॉल, आटपाडी या शिवभोजन केंद्रामध्ये अतिगंभीर स्वरुपाची अनियमितता आढळून आल्याने, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक- शाभोथा-2022/प्र.क्र. 33 / नापु-17, दि. 30 मार्च, 2022 च्या शासन परिपत्रकानुसार मी, डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली तीनही शिवभोजन केंद्र कायमस्वरूपी बंद केले आहेत.