आटपाडी : बनपुरी येथे आमच्या जागेत दगडे टाकू नको म्हणत एकाला विळ्याने मारहाण ; चौघा विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

0
30

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे आमच्या जागेत दगडे टाकू नको असे म्हणते, एकाला लोखंडी विळ्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आटपाडी पोलिसात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी दामू संदीपान टोके (वय 60) रा. बनपुरी, हे काल दिनांक २९ रोजी बनपुरी गावचे घराचे समोरील जागेत विहिरीचा मुरूम आणून ओतलेल्या मुरमाची दगडे वेचून बाजूला टाकत होते. यावेळी आरोपी अमोल शहाजी टोके हा तेथे येऊन फिर्यादीस ही आमची जागा आहे इथे दगड टाकू नको म्हणून फिर्यादीस दोन कानाखाली मारल्या.

तर चुलत भाऊ शहाजी साहेबराव टोके यांनी फिर्यादीस मारहाण करून त्याच्या हातातील वीळेची कोच फिर्यादीचे डोक्यात मारून जखमी केले आहे. फिर्यादीचे डोक्यात रक्त येऊ लागले. त्यावेळी फिर्यादीचा चुलता साहेबराव टोके यांनी येऊन फिर्यादीस मारहाण केली. फिर्यादीची पत्नी भांडणे सोडवण्यासाठी आली असता तिलाही वनिता शहाजी टोके हिने धक्काबुक्की केली. वरील तिघांनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, शिवीगाळी करून दमदाटी केली आहे.

सदर घटनेची बाबत फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात भा.द.वि.स कलम 324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here