करगणी येथील “त्या” अपघात प्रकरणी दिघंची येथील एकावर गुन्हा दाखल

0
39

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील दत्त मंदिर जवळ तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. दोन चारचाकी व एक दुचाकी अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सदरचा अपघात हा  दिनांक २८ रोजी सायंकाळी ७.०० च्या दरम्यान झाला. परंतु या अपघात प्रकरणी आटपाडी पोलिसात दिघंची येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

दिनांक 28 5 2024 रोजी सायंकाळी सहा वाजण्याचे सुमारास करगणी येथील शेटे वस्ती जवळील भिवघाट वरून आटपाडीच्या दिशेने येणारी विंटो एम एच १० ए एक्स 95 55 ही चार चाकी गाडीचे चालक बाळासाहेब संदिपान माने (वय 53) रा. दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली यांनी त्यांचे ताब्यातील गाडी अविचाराने हाय गयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून अपघात करून गाडी नंबर एम एच 45 aL 10 10 गाडीचे अंदाजे 50 हजार रुपये चे नुकसान व गाडी नंबर एम एच 48 AQ 77 41 बुलेट गाडी चे नुकसान केले आहे. सदर या अपघातामध्ये संतोष शामराव खिलारी, अश्विनी खिलारी, श्वेता खिलारी, श्रावणी खिलारी असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत शिवाजीराव श्रीरंग पाटील वय 33, व्यवसाय नोकरी (उपविभागीय अभियंता) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळासाहेब संदीपान माने वय 53, रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली या आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटने बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here