पहा पोस्टाची लोकप्रिय योजना ! 5 लाख गुंतवा, 10 लाख मिळवा, माहिती सविस्तर वाचा

0
7

अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं महत्व वाढत आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं गरजेचं आहे. दरम्यान, गुंतवणुकीचे विविध मार्ग आहेत. पोस्ट ऑफिसकडूनअनेक सरकारी योजना चालवल्या जात आहेत. ज्यामुळे लोकांना काही काळानंतर चांगला नफा मिळतो. शेअर बाजार किंवा इतर ठिकाणांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस योजनांमध्ये धोका नगण्य आहे. जर तुम्हालाही कोणतीही जोखीम न घेता जास्त पैसे कमवायचे असतील पोस्टाच्या योजनेत तुम्ही पैसे गुंतवू शकता. यामध्ये तुम्ही दुप्पट परतावा मिळतो.

किसान विकास पत्र योजना
किसान विकास पत्र (KVP) ही पोस्टाची लोकप्रिय योजना आहे. विशेषत: अधिक नफा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे काही महिन्यांत दुप्पट होतात. या योजनेत, तुम्ही 100 च्या पटीत किमान 1000 रुपयापासून गुंतवणूक करु शकता. विशेष म्हणजे यामध्ये कमाल मर्यादा नाही. तुम्हाला हवे तितके पैसे या योजनेत तुम्ही गुंतवू शकता. किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एकल आणि दुहेरी दोन्ही खाती उघडता येतात. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. तसेच, एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यालाही मर्यादा नाही. 2, 4, 6 तुम्ही किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुम्हाला हवी तेवढी खाती उघडू शकता.

या योजनेवर व्याजदर किती?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, व्याज तिमाही आधारावर ठरवला जातो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सध्या 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. हे व्याज वार्षिक आधारावर जारी केले जाते.

5 लाख रुपये गुंतवा 10 लाख रुपये मिळवा
जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले आणि मॅच्युरिटीपर्यंत म्हणजेच 115 महिने या योजनेत पैसे ठेवले तर 7.5 टक्के व्याजाच्या आधारे 5 लाख रुपये मिळतील. याचा अर्थ गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीवर 10 लाख रुपये मिळतील. त्यामुळं या योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here