लग्नाचे वचन देऊन महिलेची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार

0
385

लग्नाचे आमिष दाखवून, त्या बहाण्याने एका महिलेला फसवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंजाबमधील लुधियाना येथून एका 26 वर्षांच्या तरूणाला रविवारी अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुंबईतील खार पोलिसांनी सदर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली, आणि मुंबईत आणले. राजेश अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी राजेश या दोघांची दिल्लीतील एका प्रदर्शनादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढत गेल्या. आरोपीने तिला लग्नाचे वचन दिले होते. त्यानंतर आरोपी राजेश याने गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट 2024 या कालावधीत महिलेवर अनेकदा बलात्कार केला. मात्र लग्नाचा विषय काढताच तो थातूरमातूर उत्तरं द्यायचा. आपील फसवणूक करून अत्याचार करण्यात आल्याचे महिलेच्या लक्षात आले आणि तिने पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

त्या आधआरे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असता, तो लुधियानामध्ये असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीला लुधियाना येथून अटक करून मुंबईत आणले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here