आटपाडीत घरावर दगडफेक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंद

0
597

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील विठ्ठलनगर येथील बहादूर नानासो खरात यांच्या राहत्या घरावर गेल्या दोन महिन्यांपासून रात्री च्या वेळी अचानकपणे दगड फेक केली जात आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 

घरावर सातत्याने दगड पडत असल्याने खरात कुटुंबीय भयभयीत झाले होते. याबाबत खरात कुटुंबाने आटपाडी पोलीस ठाणे येथे उपोषण देखील केले होते. दगड पडत असल्याने, खरात कुटुंब पूर्णपणे दहशतीच्या छायेखाली वावरत आहे.
दोन महिन्यांपासून पत्र्याच्या घरावर रात्री आठ वाजता, बारा वाजता तर कधी कधी एक, दोन वाजताच अज्ञात व्यक्ती दगडफेक करत आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here