पोलिस कर्मचाऱ्याची बस चालकाला बेदम मारहाण, पहा व्हिडिओ

0
652

या पोलिस कर्मचाऱ्याने रस्त्यावर बसच्या समोर दुचाकी लावली. त्यानंतर तो बसमध्ये चढला आणि त्याने बस चालकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बस चालक पोलिस कर्मचाऱ्याला आपली चूक काय? हे विचारताना दिसत आहे.

पुण्यातून सलग दुसऱ्या दिवशी रोड रेज घटना समोर आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहेत. व्हिडिओमध्ये हेल्मेट परिधान केलेला पोलिस कर्मचारी पीएमपीएमएल बस चालकाला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या पोलिस कर्मचाऱ्याने रस्त्यावर बसच्या समोर दुचाकी लावली. त्यानंतर तो बसमध्ये चढला आणि त्याने बस चालकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बस चालक पोलिस कर्मचाऱ्याला आपली चूक काय? हे विचारताना दिसत आहे. दरम्यान, पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रोडवर शनिवारी एका महिलेवर कार चालकाने मारहाण केल्याची घटना घडली होती. शनिवारी बाणेर-पाषाण लिंक रोड येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी 57 वर्षीय पुरुष आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ –

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here