सोने-चांदीच्या घसरणीला ब्रेक; दरात उसळी; इतक्या वाढल्या किंमती

0
171

Gold and silver rates : गेल्या आठवड्यात इराण-इस्त्रायल युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर घसरलेले सोने आणि चांदीचे दर आता पुन्हा एकदा उसळले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींनी पुन्हा ‘लाखांचा टप्पा’ पार केला असून, ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे.

 

चार दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ₹1400 ची वाढ, तर चांदीत ₹1000 ची उसळी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोनं ₹1,00,528 पर्यंत पोहोचलं असून, चांदी ₹1,10,210 रुपयांवर स्थिरावली आहे.

 

जागतिक पातळीवर पुन्हा एकदा टेरिफ धोरणावर चर्चा सुरू झाल्याची घोषणा ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आल्याने बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे. तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यात घट झाल्यानेही देशांतर्गत बाजारात दरवाढ झाली आहे.

 

भारतभरातील सराफ बाजारातील दर (२ जुलै २०२५):
शहर              २४ कॅरेट सोनं (10 ग्रॅम)       चांदी (1 किलो)
जळगाव           ₹1,00,528                     ₹1,10,210
मुंबई              ₹97,290                        ₹1,06,140
दिल्ली             ₹97,130                        ₹1,05,950
कोलकाता         ₹97,170                        ₹1,06,010

 

तज्ज्ञांच्या मते, २००५ साली १० ग्रॅम सोन्याचा भाव ₹7,638 होता. आज तो ₹1 लाखाच्या पुढे गेला आहे, म्हणजेच १२००% पेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर चांदीनेही ६६८% चा परतावा दिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाल्याचं स्पष्ट होतं.

 

दरवाढीमुळे साधारण ग्राहकांची खरेदी थोडी थांबली असून, बाजारात ग्राहकांची गर्दी तुलनेने कमी झाली आहे. मात्र लग्नसराई किंवा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा खरेदीचा ओघ सुरू होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here