28 जुलैपासून बिग बॉस मराठी 5 प्रेक्षकांच्या भेटीला; रितेश देशमुख करणार सूत्रसंचालन

0
69

बिग बॉस मराठी 5 ची घोषणा झाल्यापासून हा शो कधी सुरू होणार याची उत्सुकता होती पण आता नव्या प्रोमोसह त्याचं उत्तर समोर आलं आहे. 28 जुलैपासून बिग बॉस मराठी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वर बिग बॉस पाहता येईल. यंदा महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुख सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे त्यामुळे या सीझनची उत्सुकता वाढली आहे. या सीझन मध्ये स्पर्धक म्हणून घरात कोण कोण प्रवेश करणार याची देखील आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

बिग बॉस मराठी सीझन 5

instagram.com/reel/C9Usz-HNITS