उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरला बेदम मारहाण; सीसीटीव्हीत व्हिडिओ कैद

0
399

उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर केजीएमयूमधील न्यूरोसर्जरी विभागाचे माजी एचओडी डॉ रवी देव यांच्यावर हल्ला करण्यात आला. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केल्याची घटना गोमती नगर एक्स्टेंशन येथील इग्निस हॉस्पिटलमध्ये घडली आहे. 24 जुलै रोजी समोर आलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये डॉक्टरांना मारणारा एक गट दिसत आहे.घडलेल्या घटनेवर लखनऊ पोलिसांनी प्रतिक्रीया दिली, ‘डॉक्टरला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे, आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे, गुन्हा नोंदविला जाईल आणि आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.’

व्हिडीओ पहा: