बदलापूर अत्याचार आरोपी अक्षय शिंदेला 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

0
284

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या घटनेनंतर बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंला अटक केली होती. अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानतंर आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. यानंतर कोर्टाने अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. यानतंर आता आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानतंर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले.

9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
यावेळी कल्याण न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांपर्यंत म्हणजेच 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यासोबतच याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आलं आहे. तसेच पॉक्सो गुन्ह्यात काही कलम वाढवण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांना फरार आरोपी बनवण्यात आले आहे.

दोन सदस्यीय समितीची स्थापना
तर दुसरीकडे याप्रकरणी दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने बदलापूर अल्पवयीन लैंगिक शोषण प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या प्रणालीतील त्रुटींबाबत तपासणी करण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. दीपक केसरकर यांनी हा अहवाल मंत्री यांना सुपूर्द केला आहे.

काँग्रेसची नवी मागणी
अत्याचाराची घटना घडलेल्या त्या शाळेवरील संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. तसेच या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांनी पदभार सांभाळला आहे. त्यांच्या मदतीसाठी सल्लागार म्हणून अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर आणि नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शाळेच्या संचालक मंडळावर आता काँग्रेसच्या ठाणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष राजश्री भालेराव यांनी आक्षेप घेतला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here