माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील आवळाई येथील मरिमाता जत्रेमध्ये चोरट्यांनी आपले हात साफ केले असून जत्रेला आलेल्या दिघंची येथील महिलेचे गंठन लंपास केल्याची घटना घडली. याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील आवळाई येथे प्रसिद्ध मरिमाता देवीची मोठी जत्रा भरते. दिनांक २४ रोजी दिघंची घनचक्करमळा येथील ज्योती समाधान मोरे (वय 22) या देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या. परंतु यावेळी असणाऱ्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४६ हजार रुपये किमतीचे मिनी गंठन लंपास केले.
अज्ञात चोरट्या विरुद्ध ज्योती समाधान मोरे यांनी आटपाडी पोलिसात फिर्यादी दिली असून सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.