पोलीसांच्या निषेधार्थ सावळज गाव बंद ; रोहित पाटील यांचा पोलीस ठाणेत ठिय्या

0
3

माणदेश एक्सप्रेस न्युज : तासगाव : पाण्यासाठी सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे आटपाडी-सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. विसापूर-पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाटा येथे तासाभरापासून रस्ता रोको केला आहे. या चक्काजामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

बंद केलेले पाणी तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी सावळज येथील  शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे तासाभरापासून रास्ता रोको सुरू केला आहे. जोपर्यंत अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. परंतु तासगाव पोलिसांनी या ठिकाण धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी शेतकरी व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

यावेळी तासगाव पोलिसांनी शेतकऱ्यांची धरपकड करत त्यांना तासगाव येथे पोलीस ठाणे मध्ये आणले होते. ही बाब युवा नेते रोहित पाटील यांना समजताच त्यांनी तातडीने पोलीस ठाणे येथे धाव घेत शेतकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर, माझ्यावर हि गुन्हा करा अशी मागणी लावून धरत पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या केबिन मध्ये ठिय्या मांडला. सावळक येथे या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here