आटपाडीत महसूल विभागाची वाळू विरोधात धडक कारवाई

0
1109

माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. प्रभारी तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंधरा दिवसांत तीन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत, यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

उपविभागीय अधिकारी विटा श्री. डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्या सूचनेनुसार मंडल अधिकारी संजय बोंगाळे, ग्राम महसूल अधिकारी विनायक पाटील, शेषराव मुंडे, अमीर मुल्ला, महसूल सेवक गोरख जावीर यांच्या विशेष पथकाने रात्रीच्या गस्तीतअनेक कारवाई केल्या.

 

आटपाडी येथे श्री. जाधव यांच्या मालकीचा मिनी डंपर आणि टाटा इंट्रा पिकअप जप्त केली. तर कौठुळी येथे श्रीकांत चव्हाण यांच्या मालकीचा टाटा इंट्रा पिकअप जप्त करण्यात आली. दोन्ही वाहने अवैध वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आली.

 

सदरची कारवाई केलेली वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आली असून संबंधितांवर महसूल अधिनियम 1966 आणि खाण कायद्यांतर्गत (1957) कारवाई सुरू आहे.