आटपाडी : लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत : “एवढ्या” दिवसांची पोलीस कोठडी

0
4386

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी येथे अल्पवयीन मुलीवर जिम चालक युवकाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. आरोपी जिम चालक संग्राम देशमुख यास आटपाडी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील दोन दिवसांपूर्वी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी जिम चालक संग्राम देशमुख यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये अपहरण, बलात्कार यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने चारचाकी गाडी मध्ये बसवून नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

आटपाडी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीसह महिलेवर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

 

 

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी संग्राम देशमुख हा फरार होता. अकलूज येथे चारचाकी गाडी लावून आरोपी संग्राम देशमुख हा माळशिरस रोडवर दुचाकीवर फिरत असतानाच आटपाडी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

 

आरोपीला गुन्ह्यात साथ देणारी त्याची साथीदार परिचारिका सुमित्रा लेंगरे हिला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर तिला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

जिम चालक संग्राम देशमुख यांचे अनेक कारनामे उजेडात येण्याची शक्यता असून अन्य काही महिला व मुली यांच्याशी काही गैरकृत्य केले असण्याची शक्यता असून पोलिस तपासात गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

 

बलात्कार प्रकरणातील आरोपी जिम चालक संग्राम देशमुख याला अटक करण्यात आली आहे. संग्राम देशमुख याने कोणत्याही महिला , मुली यांच्याशी गैरकृत्य केले असेल तर अशा महिला व मुलींनी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. तक्रार दाखल करावी किंवा पोलीस ठाण्यात समक्ष येणे अशक्य असल्यास तक्रारदार मुलींनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची तक्रार घेण्यात येईल व नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

विनय बहीर,

पोलीस निरीक्षक ,आटपाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here