आटपाडी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीसह महिलेवर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

0
13414

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : अल्पवयीन मुलगी आहे हे माहित असून सुद्धा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आटपाडी पोलिसात अत्याचार करणारा व त्याला मदत करणारी महिला या दोघावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, यातील पिडीत ही अल्पवयीन आहे हे माहित असून सुद्धा आरोपी संग्राम देशमुख रा. आटपाडी याने आरोपी सुमित्रा लेंगरे रा. लेंगरेवाडी यांनी पिडीत मुलीस जबरदस्तीने चारचाकी गाडीत घालून आटपाडी तलाव येथे घेवून गेले. या ठिकाणी आरोपी संग्राम देशमुख याने गाडीतच तिच्यावर बलात्कार केला, तसेच तू कोणाला सांगितलेस तर तुझ्या घरच्यांना व बहिणीला मारून टाकेन अशी धमकी दिली. तसेच पीडीतेचे संपूर्ण कपडे काढून फोटो व व्हिडिओ काढून उद्या परत माझ्यासोबत यायचे नाही तर हे फोटो सर्वांना दाखवीन अशी धमकी दिली.

 

सदर प्रकरणी आटपाडी पोलिसात आरोपी संग्राम देशमुख व सुमित्रा लेंगरे यांच्यावर विविध कलमाने गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घडलेल्या प्रकरणामुळे आटपाडी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here