आटपाडीताज्या बातम्याशैक्षणिक

आटपाडी : बोंबेवाडीच्या श्रीराम गुरुकुल विद्यालयाचा १०० टक्के निकाल ; सलग चार वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी येथील श्रीराम गुरुकुल विद्यालयाच्या १२ वी शास्त्र शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. विद्यालयात प्रथमेश नागणे हा 85 टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिला आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही श्रीराम गुरुकुल लोणारवाडी बोंबेवाडी बारावी शास्त्र शाखेचा निकाल 100% लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक नागणे प्रथमेश 85%, द्वितीय क्रमांक हिप्परकर कोमल 75.83%, तृतीय क्रमांक रणजित देशमुख 75.67%, चौथा क्रमांक -ओंकार खताळ 75%, पाचवा क्रमांक-प्रथमेश ऐवळे 72.67% यांनी पटकाविला आहे. परीक्षेला बसलेल्या 26 च्या 26 विदयार्थ्यां यांनी यश प्राप्त केले आहे.

श्रीराम गुरुकुलचा बारावी शास्त्र शाखेचा निकाल सलग चार वर्षे 100% लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शहाजी जाधव, संस्थापक दिनकर करांडे, अध्यक्ष हणमंत करांडे, सचिव श्री. घेरडे, मुख्याध्यापक नागेश चांडोले, दैवत काळेल यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button