ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरल्याने, धावत्या ट्रेनमधून प्रवाशांनी मारल्या उड्या; ५जणांचा मृत्यू

0
3

झारखंड धनबादमध्ये इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरवली, या घटनेनंतर प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उडी मारण्यास सुरु केली. चेंगराचेंगरी झाल्यामुळे या घटनेत दोन मुलांसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 14 जून रोजी रात्री 8 वाजता घडली आहे. अफवांमुळे पाच निष्पापांचा जीव गेल्याने राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सासाराम इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन धनबाद विभागातील कुमंदीह रेल्वे स्थानकावरून जात असताना ही घटना घडली. शुक्रवारी रात्री 8 वाजता काही टोळक्यांनी ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरवली. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. लोकांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारण्यास सुरुवात केली. अनेकांनी दुसऱ्या रुळावरून अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या, पलीकडून येणारी मालगाडी त्यांच्या अंगावरून गेल्याने दोन मुलांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले.

जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. या घटनेनंतर रेल्वे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अफवा कोणी पसरवली याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here