तुम्ही देखील घरात इकडे तिकडे फिरणाऱ्या झुरळांपासून त्रस्त आहेत का? स्वयंपाकघरातील हे मसाले शिंपडावे दिसतील परिणाम

0
2008

मसाल्याचा हा पदार्थ झुरळ पळवण्यासाठी खूप मदत करतो. तेज पान बारीक करून झुरळ येतात त्या ठिकाणी ठेवावे. तेज पानाच्या वासाने झुरळ येणार परत कधीच येणार नाही.

बेकिंग सोडा-
झुरळांवर रामबाण उपाय आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा फक्त झुरळच नाही तर इतर किडे देखील नष्ट करतो. एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये साखर घालावी व पाणी घालून त्याच्या छोट्या गोळ्या बनवून घ्याव्या. झुरळ ह्या गोळ्या खाऊन नष्ट होतील.

कडुलिंब-
घरघुती उपाय मध्ये नेहमी कडुलिंबाचा उपयोग केला जातो. कडूलिंब वाळवून त्याची पावडर बनवून घ्यावी. ही पावडर झुरळ जिथून येतात तिथे टाकावी. तसेच ही पावडर पाण्यामध्ये घालून हे पाणी स्प्रे बाटलीत भरावे व झुरळ दिसल्यास त्यावर स्प्रे करावा. यामुळे झुरळ नष्ट होतील.

कांदा, मिरे पूड आणि लसूण-
कांदा बारीक करून त्यामध्ये लसूण बारीक करून घ्यावा. व त्याच प्रमाणात मिरे पूड घालावी. या पेस्टला पाण्यामध्ये मिक्स करून लिक्विड तयार करावे. हे लिक्विड झुरळ सोबत अनेक किड्यांचा नायनाट करण्यास मदत करते.

(टीप : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत मानदेश एक्स्प्रेस कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here