त्वरित करा अर्ज, या पदाची भरती सुरु; वाचा सविस्तर

0
9

जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी सुवर्णसंधी म्हणावी लागेल. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) यांच्याकडून ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अधिक माहिती.

Nationalfertilizers.com या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 जुलै 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. 164 पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. B.Tech./B.E./B.Sc /MCA/MBA/PG पदवी/PG डिप्लोमा (PGDM/PGDBM)/MBA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, हेच उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाच्या अटीसोबतच वयाची अटही लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत 40 हजार रुपये ते 1 लाख 40 हजार रुपये पगार दिला जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखतही द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांची निवड ही केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 जुलै 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here