ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

“मुलीच्या प्रेमापोटीच अजित दादांना मुख्यमंत्री पदापासून लांब ठेवलं” उमेश पाटील यांचा शरद पवारांवर आरोप

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याची शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात डील झाली होती. अडीच वर्षानंतर सुप्रिया सुळेंकडे सुत्रे दिली जाणार होती. पण सुप्रिया सुळे यांचं नाव आधीच उघड केलं असतं तर त्यांना पक्षांतर्गत समर्थन मिळालं नसतं. त्याचवेळी पक्ष फुटला असता म्हणून पवार आणि ठाकरेंनी ही डील गुप्त ठेवली. दुसरीकडे शिवसेनेच्या इतर नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला. सांगलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

२००४ साली एक वेळा खासदार व तीन वेळा आमदार राहिलेले अजितदादा पवार मुख्यमंत्री पदासाठी सक्षम, अनुभवी नव्हते. डॉ. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील,छगन भुजबळ, मधुकरराव पिचड,आर आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनिल तटकरे या सारखे ३ ते ४ वेळा आमदार राहिलेले, मंत्रीपदाचा अनुभव असलेले मातब्बर नेते जर मुख्यमंत्री पदासाठी सक्षम नव्हते. तर २०१९ साली एकदाही आमदार ,खासदार नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेचाही अनुभव नसलेले,प्रशासनातील काहीच अनुभव नसणारे उध्दव ठाकरे पवारसाहेबांच्या दृष्टीने मुख्यमंत्री पदासाठी ‘सक्षम’ व ‘अनुभवी’ कसे झाले ? असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी डील

२०१९ साली भाजप सोबतच्या डीलमध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळणार नव्हते,परंतु महाविकास आघाडी स्थापन करताना पहिले अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री व पुढील अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री हा गुप्त फॅार्मुला ठरला होता.शिवसेनेचे तत्कालीन गटनेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. त्यांना बहुतेक सर्व आमदारांचे समर्थनदेखील होते परंतु संजय राऊत व अनिल देसाई यांनी पवारसाहेबांच्या समोर पुढील अडीच वर्षासाठी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याच्या मोबदल्यात पवारसाहेबांनी महाविकास आघाडीचे निमंत्रक म्हणून पहिल्या अडीच वर्षासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडावा असा प्रस्ताव समोर ठेवला. नंतरच्या अडीच वर्षासाठी स्वत: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील,असे ठरले होते असेही उमेश पाटील म्हणाले.

२००४ साली शक्य असताना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री न बनवण्यामागे त्या पदासाठी राष्ट्रवादीमध्ये अनुभवी, सक्षम नेते उपलब्ध नव्हते हे फक्त सांगायचे कारण आहे. केवळ सुप्रिया सुळेंना भविष्यात राष्ट्रवादीचा पहिला मुख्यमंत्री करण्याचा दूरदृष्टीकोन ठेवून आणि पुत्री प्रेमापोटीच अजितदादांसह अनेक जेष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री पदापासून लांब ठेवले गेले व पक्षाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असा आरोपही उमेश पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्यात योगदान देणार्याअ छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, पद्मसिंह पाटील, अजित पवार, आर.आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, मधुकर पिचड, यांच्यासह तत्कालिन नेत्यांपैकी कुणालाही मुख्यमंत्री न करून,पक्षाच्या उज्वल भविष्यावर अन्याय केला असल्याचेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

रविवारी जेष्ठ नेते शरद पवार यांनी २००४ मध्ये अजितदादा पवार मुख्यमंत्री पदासाठी अनुभवी व सक्षम नव्हते त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री केले नाही, तर छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते तर त्याचवेळी पक्ष फुटला असता असा गौप्यस्फोट केला. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी रविवारी सांगली येथे पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

शरद पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याबद्दल आदर आहेच. मात्र शरद पवार यांनी अजितदादा व भुजबळसाहेबांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलणे गरजेचे असून आजच्या तरूण पिढीला व सर्वच कार्यकर्त्यांना तत्कालीन परिस्थिती, घडामोडी, त्यानंतरच्या घडामोडी याबाबत माहिती असणे आवश्यक आहे,म्हणून वस्तुस्थिती मांडल्याचे उमेश पाटील म्हणाले.
२००४ ला अजितदादा पवार सक्षम नव्हते हा केवळ शरद पवार यांचा बहाणा आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व देण्याचे स्वप्न तेव्हापासुन होते.त्यामध्ये अडथळा नको, पक्षातील अजितदादा किंवा अन्य नेत्याला मुख्यमंत्री करून पक्षात समांतर नेतृत्व तयार होऊ नये म्हणूनच मुख्यमंत्री पद घ्यायचे टाळले गेले असा थेट आरोपही उमेश पाटील यांनी केला.

राज्यात २०१९ मध्ये भाजपसोबत जायचे नक्की झाले होते. सर्वांची सहमती होती, शरद पवारसाहेबांच्या परवानगीने व सूचनेप्रमाणे सर्व प्रक्रिया सुरू होती. मात्र तरीही ऐनवेळी निर्णय बदलण्यात आला. कारण अडीच वर्षे उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे व त्यानंतरची अडीच वर्षे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे असे डील ठरले होते. म्हणूनच भाजपसोबत जाण्याचा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button